डॉ उषा म्होप्रेकर मॅडम माझी प्रिय बॉस (श्रद्धांजली )
************************
चंद्राची शीतलता आणि सूर्याची तप्तता
धारण केलेले व्यक्तिमत्व होते
म्होप्रेकर मॅडमचे
ती शीतलता प्रियजनावर ओसंडणारी
अविरत निरपेक्ष आणि भरभरून
जी अनुभवली आहे आम्ही सर्वांनी
आणि ती तप्तता जी नव्हती कधीच
जाळणारी पोळणारी छळणारी
परंतु होती सुवर्णतप्त
कर्तव्यनिष्ठतेच्या पदाच्या अधिकाराच्या सन्मानातून आलेली
प्रमुख वैद्यकीय अधिकारी म्हणून
एम टी अगरवाल हॉस्पिटलमध्ये
त्यांनी केलेले काम
होते अतिशय प्रामाणिक
स्वच्छ आणि पारदर्शक
कोणाच्या एका रुपयाचे मिंधेपण नसलेले
स्वच्छ निष्कलंक जीवनाचा त्या आदर्श होत्या
प्रमुख वैद्यकीय अधिकारी या पदाचा
त्रास त्यांनी तेवढ्याच सामर्थपणे पेलला
जेवढा त्या पदाचा आनंद त्यांनी घेतला
मित्र आप्तेष्टा सोबत अतिशय मनमोकळेपणा
प्रामाणिक लोकांबद्दल प्रचंड आस्था
ही त्यांची प्रमुख वैशिष्ट्ये होती
काही लोक त्यांना खरोखर
मनापासून आवडायचे नाहीत
परंतु त्यांना दूर ठेवूनही
त्यांच्याबद्दल कुठलीही सूड बुद्धी आकस
न ठेवता वागल्या त्या.
एक अतिशय उदार मित्रप्रिय
स्वाभिमानी करारी निष्कलंक
निर्भय प्रामाणिक व्यक्तिमत्व
आज आपल्याला सोडून गेले आहे .
अशा व्यक्तींचे जाणें हे मित्रांसाठी
आप्तांसाठी फार मोठे नुकसान असते
पण समाजासाठी एक हानी असते
या माझ्या प्रिय बॉसला आदरांजली .
परमेश्वर त्यांना सद्गती देवो हीच प्रार्थना .
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘ 🕉️ ..